| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ९ जून २०२४
मिरज-मालगाव हा मिरज शहराला जोडणारा तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे 50 हजार रहिवासी या परिसरात राहतात. शिवाय सुभाषनगर, मालगाव, खंडेराजुरी, सलगरे, कवठेमहांकाळ आदी मिरज पूर्व भागाला जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. दिंडी वेस जवळ पुलाचे काम सुरू आहे. पूल पाडल्यानंतर वाहनधारकांना जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) ने पुलाशेजारीच ओढयात मुरूमचा भर टाकून पर्यायी रस्ता केला आहे.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढं सुध्दा समजत नव्हतं का? की, पावसाळ्यात ओढयातील पाणी पुढे प्रवाहित होण्यासाठी या पर्यायी रस्ता करताना मुरूमचा भर टाकताना मोठे पाच फुटी व्यासाचे पाइप टाकणे आवश्यक आहे. पण, दुर्दैवाने तसं न झाल्याने पावसाचे पाणी पुलावरून ओसडुन वाहत आहे. रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मती भंगल्यामुळे या भागातील रहिवासी वेठीस धरले जात आहेत.