yuva MAharashtra हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अरुण दांडेकर यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अरुण दांडेकर यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
ममदांडेकर उद्योग समूहाचे श्री अरुण दादा दांडेकर यांच्या ७५ व्या म्हणजेच हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी हिंदू एकता शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव सांगलवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार श्रीधर मिस्त्री हे उपस्थित होते.

दादांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांना उजाळा मिळाला सुरुवातीच्या काळात हिंदू एकता आंदोलन संघटनेला त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.


नवीन वर्षाचे सुरुवात म्हणून लोक ३१ डिसेंबर साजरा करायचे परंतु दादांनी नवीन वर्षाचे स्वागत म्हणून गुढीपाडव्या दिवशी पहाटे गाण्यांचे कार्यक्रम व शोभायात्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते अशा लाडक्या दादांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.