yuva MAharashtra आगामी विधानसभेसाठी अजित पवार गटाने बांधला चंग; बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी सांगितला प्लान !

आगामी विधानसभेसाठी अजित पवार गटाने बांधला चंग; बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी सांगितला प्लान !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जून २०२४
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठं अपयश आलं. या पराभवानंतर अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कोर कमिटीची बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे, विधानसभा निवडणुकीची तयारीवर चर्चा झाली. बैठक पार पडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे आम्ही आमच काम करणार असल्याचं तटकरे म्हणालेत.

लोकसभेत अपेक्षित असलेलं यश पक्षाला आणि महायुतीला मिळू शकलं नाहीये.त्याची कारणे काय आहेत, त्यावर चर्चा झाली. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. जून १० ला पक्षाचा वर्धापनदिन आहे, त्यादृष्टीने काय कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, सामाजिक उपक्रम काय असतील यावर आम्ही चर्चा झाली आहे. आमदाराच्या बैठकीत सकाळी झालेल्या कोअर कमिटीत काय चर्चा झाली याची माहिती आमदारांच्या बैठकीत देणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच आमदारांची मते जाणून घेऊ. 


मतदारसंघानिहाय आमदारांकडून तेथील स्थितीची माहिती घेतली जाईल. लोकसभेची निवडणूक काय उणिवा राहिल्या.हे जाणून घेऊ. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आक्रमकपणे काम करू. तसेच आम्ही महायुतीसोबत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. सकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही लोकसभा मतदारसंघात महायुती असून मित्रपक्षांचे मतांमध्ये रुपांतर झालं नाही,अशी चिंता व्यक्त करण्यात आली. काही विधानसभा मतदारसंघात युतीचे नेते एकत्र होते, पण स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांनी मते न दिल्याची स्थिती यावर काही नेत्यांचा बैठकीत सूर उमटला

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले तटकरे

अजित पवार गटाने पराभवानंतर आयोजित केलेल्या बैठकीत मंत्रिपदाची आशा व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी मागणी अजित पवार गटाने केलीय. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलायची असेल तर, १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी नेत्यांनी अजित पवारांकडे केली आहे. तसेच एक राज्य मंत्री आणि एक कॅबिनेट पदाची ही मागणी कोर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. परंतु कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यमंत्रिडळावर कोणतीच चर्चा झाली नसून त्यावर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री चर्चा करतील अशी माहिती तटकरे यांनी दिली.