yuva MAharashtra महाभ्रष्ट शेतकरी विरोधी महायुती सरकार विरोधात सांगली काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

महाभ्रष्ट शेतकरी विरोधी महायुती सरकार विरोधात सांगली काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा खते - बियाण्यांचा काळाबाजार व कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याविरुद्ध उद्या राज्यभर काँग्रेस रस्त्यावर उतरून चिखलफेक आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सांगली येथील काँग्रेस कमिटी समोर आ. विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या फलकावर चिखलफेक करण्यात आली. 


यावेळी महाराष्ट्र शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी आ. विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.