yuva MAharashtra भाजपावर संघाचा दबाव अजित पवारांची साथ सोडावी लागणार ?

भाजपावर संघाचा दबाव अजित पवारांची साथ सोडावी लागणार ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जून २०२४
सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे कान टोचल्यानंतर आता संघाच्याच मुखपत्रातून राष्ट्रवादीसोबत केलेल्या घरोब्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. आता भाजप संघाचं ऐकणार आणि दादांना सोडणार की युती आणखी घट्ट होणार हे आगामी काळात दिसून येईल.

ऐन लोकसभेच्या तोंडावर शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडून एकनाथ शिंदे प्रमाणेच अजित पवार यांना भाजपसोबत घेतले. खोरा असा होता, या दोघांमुळे महाराष्ट्रात '40 पार' जाता येईल. परंतु 40 पार सोडाच, भाजपाच्या पदरात अवघ्या नऊ जागा पडल्या. आणि भाजपला तोंडावर पडावे लागले. 


यानंतर भाजपा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षातूनच नव्हे तर स्वपक्षातूनही टेकेचा भडिमार सोसावा लागला. आता तर भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्षस्थ नेत्यांनी भाजप व यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत घोषणा करण्याची वेळ आली. . फडणवीस यांनी दिल्ली गाठली व भाजपच्या नेत्यांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटी भाजपने त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवून पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही असे सांगितले. कारण शेवटी या साऱ्या घटना मागे दिल्लीश्वरच होते अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. 

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधकांनी जोरदार टीका केल्याने भाजपाने अजित पवार यांची साथ सोडण्याचे ठरवले आहे असे एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा अजित पवारांची साथ सोडणार का ? हा खरा प्रश्न आहे.