Sangli Samachar

The Janshakti News

आपला कर वेळेत भरून आपल्या शहराच्या विकास कार्यात मानकरी व्हा ! - आयुक्त शुभम गुप्ता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ता धारकांनी ३० जुन २०२४ अखेर मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा एक रक्कमी भरल्यास, सदर मिळकत धारक आगाऊ रक्कम भरत असल्याने सामान्य करामध्ये १०% सवलत देण्यात आली आहे, व ३१ जुलै २०२४ अखेर भरल्यास ५% सवलत देण्यात आलेली आहे. तसेच आपल्या कराचा भरणा डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ट, युपीआय व ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सोय महानगरपालिकेकडून केली आहे. जे मालमत्ता धारक आपल्या मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात करत आहेत त्यानां ग्रोग्रिन या माध्यमातुन प्रत्येक बिलामध्ये रु.१० ची सवलत दिली जात आहे. 

सद्यस्थितीत आज अखेर ३९०० मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच आज अखेर ३५८८ इतक्या मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात केलेला आहे. तसेच महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर १३१४२ इतक्या मिळकत धारकांनी आपल्या कराचा भरणा करुन सहकार्य केले आहे. नागरिकांच्या सोईसाठी भरणा केंद्र शनिवार व रविवार दुपारी ४-०० वाजेपर्यत सुरु ठेवलेली आहेत. आज अखेर ऑनलाईन व भरणाकेद्रावर र.रु.८ कोटी ८३ लाख इतक्या रक्कमेची कराची वसुली झाली आहे. तरी आपल्या थकीत व चालू कराचा भरणा लवकरात लवकर करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. ज्या मिळकत धारकांना आपल्या बिलाबाबत शंका असलेस अशा मिळकत धारकांनी घरपट्टी विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.


मिळकतधारक एक रक्कमी बिल भरु शकत नसलेस अंशतः (पार्ट पेमेंट) भरुन घेण्याची सोय आहे. मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही. परंतु मुदतीत रक्कम भरली नाही तर सदर मागणी रक्कमेवर दंडाची आकारणी होईल. यासाठी सर्व मालमत्ता करदात्यांनी जून २०२४ अखेर कराची संपूर्ण रक्कम भरून १०% तर जुलै २०२४ अखेर भरुन ५ % सामान्य करात सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.