सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
प्रतिवर्षीचा पावसाळा हा सांगली शहरामधील सकल भागातील नागरिकांसाठी अनेक समस्या सोबत घेऊन येतो. विशेषतः सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील ड्रेनेची वाणवा, आणि पाण्याचा निचरा होण्याची समस्या ही तर येथील नागरिकांच्या पाचवीला पुरणारे आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना " पावसाळा... नको रे बाबा !" असे म्हणण्याची वेळ येते. सांगली शहरातील शामराव नगर भागात तर पावसाळ्यात या भागातील नागरिकांना नरक यातण्यापेक्षा कमी नसतो.
परंतु,जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी बुधवारी पार पडलेला दौरा आणि नुकत्याच पावसाळी पाण्याचा निचरा केला गेला नाही तर, शामरावनगर येथील इमारती दरवर्षी दोन मिलीमीटरने खचत जातील, त्यांनी व्यक्त केलेली अशी भीती, यामुळे शामराव नगरच्या भागातील धाबे दणाणले आहेत. परंतु त्यापेक्षा सांगली विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना ही भीती त्यापेक्षा मोठी ठरत आहे.
सांगली मिरज भागामधील सकल भागात साचणारे पाणी आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे सांगली विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याप्रमाणेच इतर पक्षाचे इच्छुक, यातून कसा मार्ग काढतात ? यावर या पुढील काळामध्ये शामराव नगर भागातील " पाण्याचा निचरा" हा जिव्हाळ्याचा विषय महत्त्वाचा ठरणार आहे.