Sangli Samachar

The Janshakti News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रीजन्सी आनंदम् प्रौढ शाखेचा वार्षिकोत्सव धुमधडाक्यात साजरा !


| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि. १७ जून २०२४
(विद्या कुलकर्णी, डोंबिवली )
दिनांक 16 जून 2024 रविवार रोजी रीजन्सी आनंद या ठिकाणी प्रौढ संघ प्रौढ संघ शाखेकडून शाखेतर्फे वार्षिकोत्सव खूप धुमधडाकात साजरा केला गेला कार्यक्रमाला एकूण दीडशे स्वयंसेवक आणि सहपरिवार नागरिक उपस्थित होते वार्षिकोत्सव या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रिजन्सी आनंद उत्सव मंडळ याचे प्रमुख कार्यकर्ता श्रीमान शरद साहू आणि प्रमुख वक्ते म्हणून बाजीप्रभू नगर येथील संघचालक श्रीमान मुकुंद उपाध्याय आणि नगर कार्यवाह श्रीमान वसंत गिरी यांची उपस्थिती होती . भारत मातेचीआरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाखेच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांकडून समता, सामूहिक समता, व्यायाम प्रकार, आसन, दंड बासरी वादन आणि गीतांचे प्रात्यक्षिक केले गेले. सगळीकडे अतिशय आनंदाचे वातावरण दिसत होते.


शाखा कार्यवाह श्री सुधाकर गुरव यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. तसेच प्रस्तावना आणि त्यांचा परिचय दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीमान मुकुंद उपाध्ये यांनी कुटुंब प्रबोधन विषयावर अतिशय भावनात्मक भाषण दिले. त्यामुळे उपस्थित माता-भगिनी तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक, नागरिक यांच्यात शक्ती आणि ऊर्जा निर्माण झाली. शाखेच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.