Sangli Samachar

The Janshakti News

भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळविले आहे. लोकसभेचा पराभव पचवण भाजपला अवघड जाऊ लागल्याने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याबाबत चिंतन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे असे झाल्यास राज्यात भाजप स्वतंत्र विधानसभेच्या निवडणुका लढल्या तर जास्त जागा जिंकून येतील. असा विश्वास आता भाजपच्या नेत्यांना वाटू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडी सध्या १५० जागांपेक्षा अधिक मतदारसंघात पुढे आहे. तर महायुतीला फक्त १२८ जागा जिंकता येतील. यातच महाविकास आघाडीला मराठा, मुस्लिम आणि दलितांची मते मिळाली. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीला फक्त १७ जागाच जिंकता आल्या.


यातच विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी किमान ८० जागांची मागणी शिंदे गट आणि अजित पवार गट करणार आहे. त्यामुळे त्यांना किमान प्रत्येकील ७० जागा या दोन गटाला दिल्या तर भाजपच्या वाट्याला केवळ १४८ जागा येतात. त्यात १०० आकडा पार करणे कठिण आहे. त्यामुळे बहुरंगी लढती झाल्या तर विधानसभेचे चित्र काय असेल ? तसेच महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली तर महाविकास आघाडीचे पारडे जड होऊ शकते. असे भाजपला वाटते.