| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जून २०२४
अनेकदा गाडीने फिरायला गेल्यावर चकवा लागणे हा प्रकार घडतो. जो बहुतांश हा रात्रीच्या वेळी घडतो. पण काही लोकांना दिवसा देखील चकवा लागण्याता अनुभव आला असेल. पण खरंच चकवा लागतो का ? किंवा चकवा कशामुळे लागतो असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूत असतं, त्या ठिकाणी आपल्याला चकवा लागतो आणि आपली दिशाभूल करतं, ज्यामुळे समोर असलेला रस्ता ही आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो. हा अनैसर्गिक प्रकार आहे. एखाद्या ठिकाणी अपघातात लोकांचा मृत्यू होतो असा अचानक मृत्यू आल्याने त्यांचे मन भटकत असते आणि त्यांचा आत्मा मुक्त होत नाही, त्यामुळे ते तिथेच फिरत राहतात. असं देखील काही लोक म्हणतात. पण खरंतर यामागे काही नैसर्गिक कारणं असल्याचे देखील काही कारणं समोर आली आहेत. अभ्यासकांच्या मते याचा संबंध वनस्पतीशास्त्राशी आहे.
आता तुम्ही असा तर अनुभव घेतला असणार की काही ठरावीक ठिकाणी गेल्यावर तुम्हावा मंगलमय वाटतं, याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही ठिकाणी निगेटिव फिलिंग येते. अशा गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो.
चकवा म्हणजे काय?
रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी 'रानभूल' म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव! त्याबद्दलचे थरारक अनुभव ऐकले, की मन थक्क होतं. रानभुलीला तशी अनेक नावं आहेत. आदिवासी याला 'झोटिंग' अथवा 'सावडीत' म्हणतात आणि त्याला भुताखेताचा प्रकार मानतात. खेडय़ापाडय़ातले लोक 'बाहेरची बाधा' म्हणतात. पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही. काही झाडांच्या संपर्कात आल्यास, काही वेगळंच चैतन्य जाणवू शकतं. मनाची बैचनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब (वटवृक्ष कुळातलं एक झाड). जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते.
प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची ही जाणीव दिसून येते. ऋग्वेदात विविध वनस्पतींचं माहात्म्य वर्णन करून त्यांना हे देवत्व का दिलं आहे हे वर्णिलं आहे. यजुर्वेदात कोणत्या वनस्पतीचं कोणत्या यज्ञात कोणत्या वेळी हवन करणं स्वास्थ्यास उपयुक्त आहे, ते सांगितलं आहे. अथर्ववेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमधे कसा करावा, हे सांगितलं आहे. साध्या खरचटण्यापासून ते बुद्धिभ्रंश, अपस्मार, क्षय आदी मोठय़ा आजारांवरही वनस्पतींचा कसा उपयोग करावा याबद्दल अनुभवसिद्ध माहिती दिली आहे. अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. अर्थात त्या शक्तीचीजंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घूसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया, हालचाल होते. काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते.
प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! किंवा चकवा! या रानभुलीत सापडल्यानं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो, की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही. ती व्यक्ती अर्धबेशुद्धावस्थेत राहते. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.