yuva MAharashtra गुगलने सुरु केला फ्री AI कोर्स! 10 तासांतच पूर्ण होऊन प्रमाणपत्रही दिले जाईल, आजच करा नोंदणी !

गुगलने सुरु केला फ्री AI कोर्स! 10 तासांतच पूर्ण होऊन प्रमाणपत्रही दिले जाईल, आजच करा नोंदणी !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जून २०२४
आनांदायक! लोकप्रिय टेक कंपनी गुगल आजपासून फ्री AI कोर्स सुरु करत आहे. मुख्य म्हणजे हा कोर्स 8 ते 10 तासांतच पूर्ण होतो. यासोबतच प्रमाणपत्रही देण्यात येईल. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही विशेष पदवीची आवश्यकता नाही. 

मग आजच ही बातमी वाचा आणि लगेच तुमचे नाव नोंदवा.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे क्षेत्र झपाट्याने वाढतच आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात AI पाहायला मिळत आहे. आजकाल लोक प्रत्येक कामासाठी याचा वापर करत आहे. एवढेच काय तर, महाविद्यालयांमध्येही AI संबंधित अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. याच पार्शवभूमीवर आता, तेच कंपनी गुगलने गूगल एआय एसेंशियल्‍स (Google AI Essentials) नावाच्या लोकांसाठी सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा कोर्स पूर्णपणे मोफत असून 8 ते 10 तासांत पूर्ण होतो आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येते.

कसे नाव नोंदवायचे?

https://www.coursera.org/google-learn/ai-essentials?action=enroll लिंकवरून जाऊन तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता. आजपासून ही नावनोंदणी सुरु होणार आहे. आतापर्यंत 44 हजार 256 लोकांनी आपली नावनोंदणी केली आहे. दरम्यान गुगलच्या या फ्री AI कोर्समध्ये एकूण 5 मॉड्युल आहेत. मुख्य म्हणजे, हा कोर्स कोणीही करू शकतो, यासाठी कोणत्याही विशेष पदवीशी आवश्यकता नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मॉड्यूलमध्ये AI चा इंट्रोडक्शन असेल. यामध्ये 11 व्हिडिओ असतील. 4 रिडींग आणि 2 असाइनमेंट असतील. हे मॉड्यूल 1 तासाचे आहे. दुसरा मॉड्यूल दोन तासांचा आहे, ज्यामध्ये AI टूल्सच्या मदतीने प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याबाबतची माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे, तिसऱ्या मॉड्यूलमध्ये प्रॉम्‍प्‍टबद्दल शिकवले केली जाईल. यामध्ये AI चा जबाबदारीने कसा वापर करायचा ते शिकवले जाईल.

गुगल AI कोर्सचे 5 मॉड्युल

  1. Introduction to AI (Time- 1 hour)
  2. Maximize Productivity with AI Tools (Time- 2 hours)
  3. Discover the Art of Prompt Engineering (Time- 2 hours)
  4. Use AI Responsibly (Time- 1 hour)
  5. Stay Ahead of the AI ​​Curve (Time- 2 hours)

दरम्यान असा दावा केला जात आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व्यतिरिक्त हा कोर्स लोकांना प्रॉम्प्ट इंजिनियरिंग, लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स (LLMs) आणि जनरेटिव्ह एआयसारख्या विषयांवरचे प्रशिक्षण देईल.