Sangli Samachar

The Janshakti News

आता मराठीमध्ये फ्री वापरा गुगलचे जेमिनी एआय ॲप; 9 भाषांमध्ये भारतात लॉन्च !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
गुगलने आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेलचे एआय असिस्टंट जेमिनीचे मोबाइल ॲप भारतात लॉन्च केले आहे. जेमिनी ॲप भारतात नऊ भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने यूजर्स बोलून, टाईप करून आणि फोटोंच्या मदतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. याशिवाय आता जेमिनी एआय गुगल मेसेजेसवरही वापरता येणार आहे. त्यामुळे आता युजरला हे एआय असिस्टंट वापरण्यास सोपे जाणार आहे. चला जाणून घेऊया नव्या फीचरबाबत...

या भाषांमध्ये जेमिनी एआय मोबाइल ॲपचा वापर करता येणार

गुगल जेमिनी AI चे मोबाईल ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतातील जेमिनी ॲडव्हांस युजर्स आता नऊ भाषांमध्ये त्याच्या सर्वात ॲडव्हान्स मॉडेल जेमिनी 1.5 प्रोच्या शक्तीचा वापर करू शकतात.


सुंदर पिचाई यांनी दिली माहिती

अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "आम्ही या स्थानिक भाषांना जेमिनी ॲडव्हांसमध्ये जोडत आहोत. तसेच इतर नवीन फीचर्सही जोडत आहोत. गुगल मॅसेजेसमध्ये Gemini ला इंग्रजीत लॉन्च करत आहोत. "याशिवाय, आम्ही Gemini Advanced मध्ये नवीन डेटा विश्लेषक क्षमता आणि नवीन सुविधा आणत आहोत, जसे की फाइल अपलोड करणे, आणि Google Messages मध्ये Gemini सह इंग्रजीमध्ये चॅट करण्याची सुविधाही सुरु करत आहोत" असे Gemini Experience चे उपाध्यक्ष अमर सुब्रमण्यम यांनी सांगितले.

असे करा डाउनलोड

गुगल जेमिनी ॲप डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जावे लागेल.
येथे सर्च बॉक्समध्ये 'Google Gemini' टाइप करून सर्च करा.
ॲप तुम्हाला डिस्प्ले केला जाईल, तो डाउनलोड करा आणि इंन्स्टॉल करा.
आम्ही तुम्हाला सांगतो की iOS वर जेमिनी ऍक्सेस पुढील काही आठवड्यांमध्ये थेट गुगल ॲपवरून रोल आउट होत आहे.
मिळणार एआयचा सपोर्ट

गुगल त्याच्या नवीन जेमिनी AI च्या क्षमतांना त्यांच्या इतर सेवांमध्ये समावेश करणार आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात तुम्हाला Gmail, Sheets, Docs आणि इतर Google सेवांसह एआय सपोर्ट मिळणार आहे.