| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जून २०२४
राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी दोन्ही राज्यांत भाजपची सरकारं आहेत. यामुळे याठिकाणी लोकसभा निवडणुकीत जर भाजपला फटका बसला तर मात्र याठिकाणी विधानसभा निवडणुकीत परिस्थिती अवघड होणार आहे. महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आहे.
सध्या भाजपला सोपी वाटणारी ही निवडणूक राज्यात भाजपला बराच संघर्ष करावा लागत आहे. भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतले होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. यामुळे आगामी काळात भाजपला जोरदार तयारी करावी लागणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत एनडीएने राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. सध्या महाराष्ट्र, हरयाणात भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे. पण दोन्ही राज्यांत परिस्थिती पक्षासाठी आलबेल नसल्याचे वास्तव भाजप नेतृत्त्वाला कळून चुकले आहे. यामुळे पक्ष याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. युतीमधील घटक पक्षांविरोधात नाराजीची लाट आहे. यामुळे आगामी काळात पक्ष कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.
दोन्ही राज्यांमध्ये भाजपकडून मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सगळं गणित अवलंबून आहे. यामध्ये काही दगा फटका बसला तर मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक बदल करेल, असेही सांगितले जात आहे.