Sangli Samachar

The Janshakti News

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर पावसाचे सावट, 30 सप्टेंबर पर्यंत निवडणुका लांबल्या !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जून २०२४
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेतला होता. परंतु हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 100% होऊन अधिक पाऊस झाला आहे तर पाच जिल्ह्यात सरासरीच्या 70 टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, लागवड व शेतीच्या अन्य कामात व्यस्त असतात. बहुसंख्य सहकारी संस्थांचे सभासद हे शेतकरी असल्यामुळे ते सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील की नाही अशी शंका व्यक्त करण्यात आल्याने 30 सप्टेंबर पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरे तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेऊन त्यातून आगामी विधानसभेची पेरणी करायची असा सरकारचा इरादा होता. सहकारी संस्थांवर आपले अधिकाधिक कार्यकर्ते निवडून आणून त्यांचा विधानसभेला मतदान जागृती साठी उपयोग करून घ्यायचा असा उद्देश त्यामागे होता. परंतु यावर पावसाने पाणी फिरवले. 

या निर्णयाचा सांगली जिल्ह्यातील जवळपास 50 संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.