yuva MAharashtra सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या; पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे !

सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या; पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जून २०२४
पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या 274 शिक्षकांना अखेर शुक्रवारी रात्री नियुक्त्या देण्यात आल्या. गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासन निवडणूक कामात गुंतल्याने नियुकत्या लांबल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पवित्रमधील शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नूतन शिक्षकांना जिल्ह्याची भौगोलिक रचना समजावून सांगत शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृध्दींगत करावी, असे आवाहन केले. जिल्ह्याचा शैक्षणिक रोड मॅप तयार असून शिक्षकांनी तो समजून घ्यावा. जिल्हा परिषदेचा नावलौकीक आहे, त्याला बाधा येणार नसल्याची दक्षता घ्यावी असे आवाहन धोडमिसे यांनी केले.

बहुतांश शिक्षक मराठवाड्यातून पवित्र पोर्टलमधून आलेले बहुतांश शिक्षक मराठवाड्यातील आहेत. सर्रास शिक्षकांना जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यात नियुक्त्या मिळाल्या आहेत. प्रत्येक शाळेला पुरेसे शिक्षक मिळतील याची दक्षता घेतल्याचे धोडमिसे म्हणाल्या.


प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमधूप 481 शिक्षकांची मागणी केली होती, त्यापैकी 274 शिक्षक प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर आचारसंहिता व्ही नियमित शिक्षकांच्या बदल्यामुळे नियुक्त्या लांबल्या होत्या. जिल्हा परिषदेत चार दिवसांपासून शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरु होती, ही प्रक्रिया संपताच पवित्र पोर्टलमधून आलेल्या 274 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पदस्थापना देण्याचे काम सुरु होते.

पहिल्या दिवशीच हजर होण्याचे आदेश
उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारपासून (दि.15) झाल्या. पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना शाळा देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरुच होते. त्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी या शिक्षकांनी हजर व्हावे असे आदेश धोडमिसे यांनी दिले.