सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि. २७ जून २०२४
..........................
विद्या कुलकर्णी (डोंबिवली)
..........................
उत्कृष्ट रोटरी वर्ष २०२३-२४ हे ३० जून २०२४ रोजी संपेल. परंतु रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे उत्कृष्ट क्लब अध्यक्ष श्री. रघुनाथ लोटे आणि त्यांची समिती सर्व प्रकल्प मोठ्या वचनबद्धतेने चालवित आहेत. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने शनिवार दिनांक २२ जून २०२४ रोजी धर्मवीर आनंद दिघे शाळा, शहापूर, जि. ठाणे येथे तीन प्रकल्प राबविण्यात आले.
प्रकल्प एक - सायकल देणगी अंतर्गत, क्लबने आदिवासी भागातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना ५० नवीन सायकली ह्या भेट म्हणून दिल्या आहेत. बाजारात एका नवीन सायकलची किंमत सुमारे रु. ४६०० इतकी आहे.
प्रकल्प दोन - या अंतर्गत आमच्या क्लबने त्याच आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि जागतिक विषयांवर व्याख्याने आयोजित केली. क्लब चे सदस्य रोटेरिअन विशाल सरुक, रोटेरिअन अनुज यादव आणि रोटेरिअन डॉ. भक्ती लोटे यांनी ही व्याख्याने दिली.या व्याख्यानांना जवळ जवळ १०० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यातील विद्यार्थी उपस्थित होते.
प्रकल्प तीन - या अंतर्गत क्लबनी शाळेच्या आवारात उपस्थित सर्व क्लब सदस्यांच्या साथीने नविन पंचवीस झाडे लावली. या तिन्ही प्रकल्पांना क्लब चे अध्यक्ष रघुनाथ लोटे ह्याच्या साथीने दिवसभर उपस्थित राहून पाठिंबा देण्यासाठी क्लब चे सदस्य संभाजी कोकिटकर, माजी अध्यक्ष संतोष भणगे, सुरेश जैन, विजय सोनावणे, दिलीप यादव, संजय जोशी आणि डॉ. भक्ती लोटे यांनी मोठे परिश्रम घेतले.
तसेच आज गुरुवार, दिनांक २७ जून रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट तर्फे खुटाळ गाव, तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथील गरजू मुलांना २५ नविन सायकली ह्या देण्यात आल्या. ह्या शाळेच्या परिसरात नविन झाडे सुद्धा लावण्यात येणार आहेत अशी माहिती क्लब चे जनसंपर्क संचालक रोटेरिअन मानस पिंगळे ह्यांनी दिली.