Sangli Samachar

The Janshakti News

रेल्वेला महिन्याला किती येतं वीज बिल ? 1km धावण्यासाठी किती येतो खर्च ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
भारतात, बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करतात. लोकल तर मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. ज्यामुळे लोकांना वेळेवर एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होते. यासाठी रेल्वे प्रवाशांना अगदी कमी पैसे आकारते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रेल्वेला किती वीज बिल येत असेल? किंवा ट्रेन किती वीज वापरते

भारतीय रेल्वेच्या निम्म्या गाड्या विजेवर चालतात तर काही गाड्या डिझेलवर चालतात. 1 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यासाठी 20 युनिट्स खर्च होतात. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर, अजमेर रेल्वे विभागात धावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेन 20 युनिट्समध्ये एक किलोमीटर अंतर कापत आहेत. विशेष म्हणजे डिझेल इंजिनच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या अधिक किफायतशीर आणि स्वस्त आहेत. गाड्यांमधील वीजबिलाबद्दल बोलायचे झाले तर, रेल्वे प्रति युनिट विजेचे अंदाजे 6.50 रुपये देते. अशा परिस्थितीत 1 किलोमीटर चालत असताना 20 युनिट वीज वापरली तर एक किलोमीटरचा एकूण खर्च 130 रुपये येतो.


यानुसार एका महिन्यात किती वीज वापरली जाते यावर रेल्वेचे वीज बिल अवलंबून असते. याशिवाय तुमच्या मनात हा प्रश्नही असेल की कधी कधी अनेक भागात वीज जाते, मग ट्रेन का थांबत नाही? आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वेला थेट पॉवर ग्रीडमधून वीज मिळते. त्यामुळे ट्रेनमध्ये कधीही वीजपुरवठा खंडित होत नाही. ही वीज पॉवर प्लांटमधून ग्रीडला पुरवली जाते, जिथून ती सबस्टेशनला पाठवली जाते. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या बाजूला विद्युत उपकेंद्र दिसतात.