yuva MAharashtra लघु उद्योगासाठी पुरस्कारासाठी 15 जुलै पूर्वी अर्ज करावेत - विद्या कुलकर्णी

लघु उद्योगासाठी पुरस्कारासाठी 15 जुलै पूर्वी अर्ज करावेत - विद्या कुलकर्णी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लोगो देऊ नका राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2024 असं जिल्ह्यातील पात्र लघुउद्योजकाने विहित नमुन्यात अर्ज करावेत असे आवाहन झेंडा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक येत्या कोर्टाने यांनी केले आहे. 

जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघुउद्योग म्हणून संचनालय यांच्याकडे मागील तीन वर्षापूर्वीचा नोंदणीकृत असावा. लघुउद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापूर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा.

पुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन, व्यवसायाचे ठिकाण, सामाजिक कार्य कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या सोयी सवलती, आयात निर्यात क्षमता, स्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील उद्योजक असावा. उत्पादित वस्तू बाबतचे गुणवत्ता इत्यादी विचार या पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे.


या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकास पंधरा हजार रुपये तर द्वितीय पुरस्कारासाठी दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ व मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात येते. पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्याकडे विराममूल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्याकरिता तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन सांगली, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.