सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जून २०२४
प्रादेशिक परिवहन कार्यालय भ्रष्टाचाराचे करून झाले आहे. आरटीओ चा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओ चा 125 कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत अशी लायसन्स जारी केल्यानेच पुणे येथे घडलेल्या पोरशे कार अपघाता सारखी प्रकरणे घडत आहेत तो दुचाकी वर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स दारी केले आहेत तर इतर 35000 261 ड्रायव्हिंग लायसन्स दोन कार वर देण्यात आले आहेत
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. निरपराध माणसांचा बळी जातो आहे. पुण्यासह देशात अनेक ठिकाणी अपघाताची गंभीर प्रकरणे घडलेली आहेत. माने याची गंभीर दखल घेऊन राज्यातील सर्वच आरटीओंची चौकशी करावी असेही वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या मागणीने वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.