| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ मे २०२४
शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडला आहे. खोदकाम सुरू असताना हा बॉम्ब आढळून आहे. यामुळे कामगार चांगलेच धास्तावले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. बॉम्बची माहिती मिळताच बीडीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहेे.
पुणे जिल्हा बँकेवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकाचे निलंबन
बॉम्ब निकामी करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन बीडीडीएस पथकाकडून करण्यात आलं आहे. बॉम्ब निकामी झाल्याचं कळताच पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एनडीए परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. याठिकाणी काही मजूर काम करत असताना त्यांना अचानक बॉम्ब दिसून आला. बॉम्ब आढळून आल्याने कामगार चांगलेच धास्तावले.
त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बीडीडीएस पथकाने तातडीने धाव घेतली. हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून त्याची पॉवर कमी करण्यात आली आहे. बॉम्बची विल्हेवाट लावण्यात आली असून नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये, असं बीडीडीएस पथकाने सांगितलं आहे. नेमका हा बॉम्ब कुठून आला? अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती. जवळच एनडीए असल्याने सराव करत असताना अनेक वर्षांपूर्वी हा बॉम्ब पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.