| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२४
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष असताना रिलायन्सजिओने मोठं पाऊल उचललं आहे. पेटीएमच्या सेवा बंद होण्याची चर्चा सुरु असतानाच जिओने मोठी घोषणा केली आहे. पेटीएम, फोनपेला आव्हान देत रिलायन्स जिओने 'जिओ फायनान्स ॲप'ची बीटा आवृत्ती लाँच केली आहे. याद्वारे तुम्ही आता युपीआय पेमेंट देखील करू शकणार आहात. बुधवारी कंपनीने जिओ फायनान्स ॲपची बीटा आवृत्ती लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडने बुधवारी जिओ फायनान्स ॲप लाँच केले आहे. कंपनीने हे ॲप बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटलं की, जिओ फायनान्स ॲप हे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप दैनंदिन वित्त आणि डिजिटल बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे. सोप्या भाषेत तुम्ही पेटीएम, फोनपे इत्यादीद्वारे युपीआय पेमेंट करता, त्याचप्रमाणे तुम्ही जिओ फायनान्स ॲपद्वारे देखील पेमेंट करू शकणार आहात.
कंपनीने म्हटले की, या ॲपद्वारे लोकांना युपीआय, डिजिटल बँकिंग आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज यांसारख्या सुविधा देणार आहेत. याद्वारे डिजिटल बँकिंग, युपीआय व्यवहार, बिल सेटलमेंट्स आणि इन्शूरन्स कंन्सल्टेंट यासारख्या गोष्टी एकाच ठिकाणी करता येणार आहेत.
कंपनीने म्हटले की, या ॲपद्वारे लोकांना युपीआय, डिजिटल बँकिंग आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज यांसारख्या सुविधा देणार आहेत. याद्वारे डिजिटल बँकिंग, युपीआय व्यवहार, बिल सेटलमेंट्स आणि इन्शूरन्स कंन्सल्टेंट यासारख्या गोष्टी एकाच ठिकाणी करता येणार आहेत.
ॲपच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 'जिओ पेमेंट्स बँक खाते' सुविधेसह झटपट डिजिटल खाते उघडणे आणि सुव्यवस्थित बँक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. ग्राहकांचे समाधान होण्यासाठी 'जिओ फायनान्स' बीटा अर्थात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत, त्याच्या सुधारणेसाठी युजर्सकडून सूचना मागवल्या जातील, असेही कंपनीने म्हटलं आहे. "आमचे उद्दिष्ट कर्ज, गुंतवणूक, विमा, पेमेंट आणि व्यवहार यांसारख्या सर्वसमावेशक ऑफरसह प्रत्येक वर्गातील लोकांसाठी एकाच व्यासपीठावर वित्ताशी संबंधित सर्व गोष्टी सुलभ करणे आणि वित्तीय सेवा अधिक पारदर्शक, परवडणारी बनवणे हे आहे," असे कंपनीने म्हटलं आहे.