| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ मे २०२४
देशात गेल्या पाच वर्षांत महिला न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टेट ऑफ द ज्युडिशियरी'च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये महिला न्यायाधीशांची संख्या 27 टक्के होती ती 2023 मध्ये 34.6 टक्के झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात 2023 पर्यंत 32 न्यायाधीशांपैकी केवळ तीन महिला न्यायाधीश होत्या, तर उच्च न्यायालयात 696 न्यायाधीशांपैकी केवळ 10 टक्के महिला न्यायाधीश होत्या. पंजाब आणि हरयाणा, दिल्ली आणि मुंबई हायकोर्टात सर्वाधिक अनुक्रमे 13, 10 आणि 9 आहेत, तर ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या सर्वात कमी आहे. पटणा, उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर न्यायालयात एकही महिला न्यायाधीश नाही.