yuva MAharashtra अमरनाथ खराडे आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवेल : आ. सुधीरदादा गाडगीळ

अमरनाथ खराडे आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवेल : आ. सुधीरदादा गाडगीळ



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२४
वृत्तपत्रसृष्टीचा वारसा सांभाळणाऱ्या खराडे कुटुंबातील अमरनाथ खराडे हा चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवेल, मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करून नाट्य पंढरी सांगलीची ओळख चित्रनगरी सांगली असा करेल, असा विश्वास आम. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केला त्यांनी अमरनाथच्या भावी वाटचालीला सांगलीकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

ए.एस.के. फिल्मच्या अमरनाथ खराडे निर्मित, दिग्दर्शित 'डिअर लव्ह' या मराठी चित्रपटाचा सांगलीच्या न्यु प्राईड सिनेमागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमीअर (शुभारंभ) समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आ. गाडगीळ बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रा. पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शेखर माने, भाजपाचे श्रीकांत शिंदे, प्रा. डॉ. नितिन नायक, चित्रपट निर्माते सुनिल फडतरे यांच्यासह अमरनाथ खराडे यांचे वडील दै. ललकारचे संपादक सुभाष खराडे, मातोश्री अरूणा खराडे, बंधू व कार्यकारी निर्माते ऋषिकेश खराडे व 'डिअर लव्ह' या चित्रपटातील सर्व कलाकारांची टीम उपस्थित होती.


यावेळी अनेकांनी अमरनाथ खराडे यांच्या धाडसाचे कौतुक केले. पृथ्वीराज पाटील, विठ्ठल पाटील, दिगंबर जाधव यांनी अमरनाथला शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. चित्रपट टीमच्या वतीने अमरनाथ खराडे आणि किरण ढाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खचाखच भरलेल्या चित्रपटगृहातील रसिकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात अमरनाथ खराडे आणि त्यांच्या टीमचे स्वागत केले. तर न्यू प्राईड चित्रपटगृहाते मालक मयंक शाह यांनी सहकार्य केले.