yuva MAharashtra झुंज अपयशी... करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन !

झुंज अपयशी... करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन !



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २३ मे २०२४
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील आज पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. आमदार सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. रविवारी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

पी.एन पाटील यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आमदार आणि कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी फेबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो."


आमदार पी.एन पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता सडोली खालसा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार पार पडले. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ठेवले होते.