| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० मे २०२४
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, देशाला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असेल देशातील समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना त्याने दुखावलेले आहेत. याबद्दल त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज सांगली येथे भाजप तर्फे करण्यात आली.
तथाकथित शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती श्लोकाचे समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याच्या निषेधार्थ आव्हाड यांनी महाड येथे केलेले आंदोलनाच्या वेळी मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना त्यावरील डॉ. आंबेडकर यांचा फोटो पाडण्यात आला. यावरून संपूर्ण राज्यात आव्हाड यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
सांगली येथील आंबेडकर पुतळ्याजवळ भाजप तर्फे आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच त्यांच्या राजनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी सुधीर दादा गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, अविनाश मोहिते, पै. पृथ्वीराज पवार, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.