| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
देशातील लोकप्रिया आणि कायम चर्चेत असणारे कथावाचक महाराज देवकीनंदन यांनी केलेल्या विधानावरुन आता चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे. देवकीनंद यांनी हिंदुंना ५-५ मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला आहे. वक्फ बोर्डाप्रमाणे देशात सनातन बोर्डही असावा. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा, असं त्यांनी म्हटलंय.
देवकीनंद ठाकूर म्हणाले की, आपण एकट्याने केवळ कुटुंब नियोजन करावे आणि इतरांनी कुटुंब वाढवलं पाहिजे. मी लोकसंख्या नियंत्रणासाठी याचिका दाखल केली आहे. आता आपण दीडशे कोटींवर गेलो आहोत. मात्र हा कायदा होईपर्यंत हिंदुंना लोकसंख्या तरी वाढवता येतील. सनातनांना निदान मुलं तरी होतील. आम्हाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार असेल तर प्रत्येकाला एकच पत्नी ठेवण्याचा अधिकार द्या. जर आपल्याला एक मूल असेल तर प्रत्येकाला दोन मुले असावीत.
वक्फ बोर्डाला जे अधिकार दिले आहेत तेच सनातन बोर्डालाही अधिकार मिळावा. मथुरा येथे श्रीकृष्णजन्मभूमीवर पाठिंबा देण्याचं आवाहन देवकीनंदन शास्त्री यांनी केलं आहे. मंदीर उभारणीला सर्व विरोधी पक्षनेत्यांनी पाठिंबा दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ, असंही देवकीनंदर ठाकूर म्हणाले.