| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. रियल्टी, ऑइल-गॅस, मेटल आणि पॉवर इंडेक्समघध्ये सर्वाधिक वाढ झाली. ऑटो आणि कंझ्युमर गुड्सच्या शेअर्समध्येही खरेदी झाली. त्याच वेळी एफएमसीजी आणि फार्मा इंडेक्समध्ये विक्री दिसून आली.
व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 328 अंकांनी वधारला आणि 73,105 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 114 अंकांनी वाढून 22,218 वर बंद झाला. बँक निफ्टी 105 अंकांनी वाढून 47,859 वर बंद झाला. तर मिडकॅप 490 अंकांनी वाढून 50,225 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांबाबतच्या अंदाजांमुळे बाजारात अस्थिरता वाढल्याचे अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या अनिता गांधी म्हणाल्या. याशिवाय एफआयआयने केलेल्या विक्रीमुळे इंडेक्स घसरत आहेत. महागड्या व्हॅल्युएशनमुळे बाजारात प्रॉफिट बुकिंगही झाली. पण, एकदा की निफ्टी 50 इंडेक्स 22,000 च्या खाली गेला की पुन्हा खरेदी सुरू होईल.
लार्ज कॅप शेअर्सचे व्हॅल्युएशन योग्य दिसत असल्याचे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना म्हणाले. यामुळे लार्ज कॅपमध्ये व्हॅल्यू बाईंगला प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी बेंचमार्क इंडेक्समध्ये वाढ होण्याचे श्रेय चांगले जागतिक संकेत आणि शॉर्ट पोझिशन्स कव्हर करणाऱ्या ट्रेडर्सना दिले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेक्टरमधील व्हॅल्युएशन महाग आहेत, ज्यामुळे काही सेगमेंट्समध्ये खराब कामगिरीचा धोका आहे.
Cognizant: कॉग्निझंट कंपनीचा धक्कादायक निर्णय! कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न आल्यास जाणार नोकरी; काय आहे प्रकरण?
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
ओएनजीसी (ONGC)
एल अँड टी (LT)
आयडीया (IDEA)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
एमफॅसिस (MPHASIS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
भारत फोर्ज (BHARATFORG)
क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.