| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २३ मे २०२४
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील दोन तरुणांचा दारु सोडण्याचा औषध घेतल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर आहेत. हे चारही शेतकरी वर्धा जिल्ह्यातील गुळगाव या ठिकाणी आहे. या शेतकऱ्यांनी दारु सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे औषध घेतले होते. हे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
मिळावलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गुळगाव या ठिकाणी राहणाऱ्या 2 युवकांचा दारु सोडण्याचे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे, प्रतीक घनश्याम दडमल अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही गुडगाव या ठिकाणी वास्तव्यास होते. तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे आणि सोमेश्वर उद्धव वाकडे या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
गुडगावमध्ये राहणारे चार मद्यपी हे वर्धा जिल्ह्यातील शेडगाव या ठिकाणी असलेल्या शेळके महाराजांकडे दारु सोडवण्यासाठी गेले होते. यावेळी त्या महाराजांनी त्यांना दारु सोडण्यासाठीचे औषध दिले होते. त्यानंतर हे चौघेही आपल्या गावी गुळगाव येथे परतले. यानंतर त्या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सहयोग आणि प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास भद्रावती पोलीस करत आहेत.