yuva MAharashtra राहुल गांधी पंतप्रधान होणार की नरेंद्र मोदी? फलोदी नंतर गाजतंय मुंबई सट्टा बाजाराचे गणित !

राहुल गांधी पंतप्रधान होणार की नरेंद्र मोदी? फलोदी नंतर गाजतंय मुंबई सट्टा बाजाराचे गणित !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ मे २०२४
देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा बाकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील NDA आणि विरोधी पक्ष इंडिया आघाडी आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत सर्वांच्या नजरा राजस्थानच्या प्रसिद्ध फलोदी सट्टे बाजाराकडे असतात. यावेळी फलोदी सट्टाबाजार कोणाला विजयी करत आहे आणि किती जागा कोणाला दिल्या जात आहेत, याचीच चर्चा लोकांमध्ये होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यानंतर देशात काय होणार याचा अंदाज फलोदी सट्टा बाजाराने वर्तवला आहे.

NDA- 407

UPA- 136

फलोदी सट्टा मार्केटमध्ये भाजपने 300 हून अधिक जागा जिंकण्याचा सट्टा लावला आहे. त्याच वेळी, काँग्रेसच्या 60-63 जागा कमी होऊ शकतात, जे 2019 च्या 52 जागांच्या तुलनेत कमी आहे. उर्वरीत जागा इतर पक्षांच्या येणार असल्याचे फलोदी सट्टा बाजाराने सांगितले आहे.

मुंबईचा सट्टा पूर्णपणे विरुद्ध दिसत आहे. कोणताही पक्ष पूर्ण बहुमताने सरकार बनवताना दिसत नाही. येथे सर्वाधिक बोली राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर लावली जात आहे. या दोन्ही पक्षांचे दोन तुकडे झाले असून त्यांच्या लढतीचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

NDA- 195

UPA- 348


महाराष्ट्रात - एकूण जागा - 48

BJP- 18

INDIA- 30

भाजप कोणत्या राज्यात कमकुवत आहे?

सट्टे बाजारानुसार, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान आणि बिहारमध्ये भाजपचे नुकसान होत आहे. या राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राजस्थानमध्ये भाजपला 19 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणातही दोन्ही पक्षांना प्रत्येकी 5 जागा मिळण्याची शक्यता असून महाराष्ट्रातही शिवसेना भाजप युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. या वेळी महाराष्ट्रात पूर्वीच्या तुलनेत 10 जागा कमी होण्याचे संकेत आहेत.

कोणत्या राज्यांमध्ये भाजपची स्थिती मजबूत ?

सट्टे बाजारानुसार, यावेळी देशात भाजपची स्थिती कर्नाटक आणि बंगालमध्ये मजबूत होत आहे, बंगालमध्ये भाजपला 20 ते 22 जागा मिळू शकतात, तर कर्नाटकमध्येही भाजपला 22 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. सट्टे बाजाराच्या मते, संपूर्ण देशात भाजपला 304 ते 306 जागा आणि एनडीएला 324 ते 329 जागा मिळू शकतात.

सट्टाबाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा भाव अवघ्या 15 ते 20 पैशांवर चालू आहे. म्हणजेच जितकी किंमत कमी तितकी त्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त, त्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार नक्कीच स्थापन होईल असा अंदाज आहे.

टीप - या बातमीचा उद्देश फक्त सट्टे बाजारात चाललेला ट्रेंड दर्शविणे आहे. ही बातमी या दाव्यांचे समर्थन करत नाहीत. परिणाम यापेक्षा वेगळे असू शकतात. 
जुगार हा कायदेशीर गुन्हा आहे.