yuva MAharashtra जीवनच ठरणार मृत्यूचं कारण! वैज्ञानिकांनी सांगितला पृथ्वीचा असा भयानक अंत

जीवनच ठरणार मृत्यूचं कारण! वैज्ञानिकांनी सांगितला पृथ्वीचा असा भयानक अंत



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ मे २०२४
एक ना दिवस पृथ्वीचा अंत होणार असं म्हटलं जातं. पण कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात. कधी हजारो वर्षांनी तर कधी लाखो वर्षांनंतर पृथ्वीचा अंत होईल असं म्हटलं जातं. पण पृथ्वीचा अंत कधी होणार, पृथ्वीच्या अंताची तारीख जवळ आली आहे का? पृथ्वीचा अंत कसा होणार? याबाबत वैज्ञानिकांना काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं पृथ्वीचा अंत सांगितला आहे, त्याचा कुणी विचारही केला नसेल.

धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की कलियुगात मनुष्य इतके पाप करतील की लोक देवापासून दूर जातील. मग सगळीकडे अंधार होईल. यानंतर सर्व काही नष्ट होईल. पण विज्ञान काय मानतं? नेचर जिओसायन्समध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार पृथ्वीचा शेवट सूर्यामुळेच होणार आहे.

ऑक्सिजन संपणार, श्वास गुदमरणार

सूर्याच्या किरणोत्सर्गामुळे पृथ्वीच्या वातावरणाची वाफ होईल. सर्व ऑक्सिजन शोषून घेईल. त्यामुळे जीवांना ऑक्सिजन मिळणे बंद होऊन सर्वांचा मृत्यू होईल. पृथ्वीवर कार्बनचे धुके झपाट्याने वाढू लागतील, ज्यामुळे मनुष्य, प्राणी आणि वनस्पतींचाही श्वास गुदमरण्यास सुरुवात होईल. महासागरातील पाणी कोरडे होईल. सर्वप्रथम, पृथ्वी वेगाने गरम होईल आणि वातावरणातील कार्बोनेट-सिलिकेटचे प्रमाण वेगाने वाढेल. परिणामी, एक वेळ अशी येईल की, आपत्तीची परिस्थिती निर्माण होईल. यामुळे पृथ्वीचा नाश होईल, पृथ्वी फक्त एक नापीक खडक दिसेल.

पृथ्वी थंड होऊन पाण्यात बुडणार

यानंतर पृथ्वी खूप वेगाने थंड होण्यास सुरुवात होईल. हिमनद्या वितळतील आणि संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून जाईल. फक्त काही ठिकाणं उरतील जिथं पाणी नसेल. हजारो वर्षांनंतर पृथ्वी बर्फाचा गोळा बनू लागेल. मग पृथ्वीभोवती फक्त बर्फच असेल. महासागर आणि जमीन एकमेकांमध्ये विलीन झालेले दिसतील.

कधी होणार पृथ्वीचा अंत?

यावरून तुम्ही समजू शकता की आज गुरुत्वाकर्षण आणि उर्जेचा अत्यावश्यक स्त्रोत असलेला सूर्य एक दिवस पृथ्वीच्या विनाशाचं कारण बनेल. तो आपली निळी संगमरवरी पृथ्वी गिळंकृत करेल. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की अशी परिस्थिती आजपासून सुमारे एक अब्ज वर्षांनंतर येईल. तोपर्यंत