| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २३ मे २०२४
देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये ईमेलच्या माध्यमातून धमक्या दिल्या जाण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी शाळा, एअरपोर्ट, हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
एमएचए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेलच्या माध्यमातून बॉम्बची धमकी देण्यात आली होती. ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आणि गृह मंत्रालया बिल्डिंगमध्ये शोध मोहिम चालवण्यात आली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. इतकेच नाही तर हा ईमेल कोणी पाठवला आणि कुठून पाठवला याचा देखील शोध घेणे सुरू आहे.
दिल्ली फायर ब्रिगेडच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने सांगितले खी पोलीस आणि फायर ब्रिगेडट्या टीम सोबतच डॉग स्कॉयड आणि बॉम्ब नाशक पथक देखील गृह मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली होती. नॉर्थ ब्लॉकमधील एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. यानंतर सर्व टीम येथे पोहचल्या आणि संपूर्ण बिल्डिंगमध्ये सर्च ऑपरेशन चालवण्यात आले, मात्र यामध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नाही. जनसत्ताने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.