yuva MAharashtra विद्यार्थ्याचा प्रश्न, शिक्षकही देऊ शकले नाही उत्तर; तुम्हाला जमलं तर मानलं

विद्यार्थ्याचा प्रश्न, शिक्षकही देऊ शकले नाही उत्तर; तुम्हाला जमलं तर मानलं



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
असे काही प्रश्न असतात ज्याची उत्तरं काय द्यावीत तेच समजत नाही. असाच एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला विचारलेला हा प्रश्न. हा प्रश्न असा की शिक्षकालाही त्याचं उत्तर देता आलं नाही. भल्याभल्यांना या प्रश्नाचं उत्तर काय ते माहिती नाही. तुम्ही जर याचं उत्तर दिलंत तर तुमच्यापेक्षा हुशार कुणीच नाही.

काही शिक्षक असे असतात जे फक्त शाळा, कॉलेजमध्येच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं निरसन अगदी फोनवरही करतात. फोनवर आपल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी तयार असलेला असाच एक शिक्षक. विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला व्हॉट्सअपवर एक प्रश्न विचारला. तो प्रश्न वाचल्यानंतर शिक्षक कोमात गेला असं म्हणायला हरकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील त्या चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.


विद्यार्थ्याने विचारला विचित्र प्रश्न

आता या विद्यार्थ्याने असा कोणता प्रश्न विचारला की शिक्षकांनाही त्याचं उत्तर माहिती नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तो प्रश्न जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

विद्यार्थ्याने आपल्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकाला मेसेज केला आहे. इंग्लिश सर म्हणून त्याने त्यांचा नंबर सेव्ह केला आहे. आधी त्याने विचारलं, 'सर, तुम्ही इंग्रजीत तज्ज्ञ आहात का?' तर शिक्षकानं उत्तर दिलं, 'हो, यात शंका नाही.' त्यावर विद्यार्थ्याने ठिक आहे, मग या प्रश्नाचं उत्तर द्या, असं म्हणत एक प्रश्न विचारला. जो वाचल्यानंतर सर्वांचा गोंधळ उडाला. मुलाने इंग्रजीत प्रश्न विचारला आहे. 'आईने मुलीला मारलं कारण ती नशेत होती, मग नशेत कोण होतं?ते सांगा', असा सवाल त्याने केला. आता यावरून आईनं नशेत मुलाली मारलं की मुलगी नशेत होती म्हणून आईने मुलीला मारलं, हे काहीच स्पष्ट होत नाही. मग नशेत नक्की होतं कोण याचं उत्तर देणं कठीणच आहे.

प्रश्नाने उडाला गोंधळ

या चॅटचा स्क्रीनशॉट फनीचॅट्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. पाहण्यासाठी इथं क्लिक करा. ज्यावर बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका युझरने ही कौटुंबिक बाब आहे, दूर राहा, असं म्हटलं आहे. तर एकाने मी नशेत आहे, अशी कमेंट केली आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे सांगू शकता का? याचं उत्तर दिलं तर तुम्हाला मानलं. तुमच्यासारखं हुशार मग कुणीच नसेल.