सीबीएसई बोर्डाच्या २०२३-२४ च्या दहावी परीक्षेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा १००% निकाल लागला आहे. सलग ९ व्या वर्षी १००% निकाल लावून शाळेने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातील गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
शाळेचा विद्यार्थी सोहम दबडे याने ९६.८ टक्के गुण घेऊन प्रथम, पियुष पवार याने ९६.२टक्के गुणांनी द्वितीय तर श्रीजीत ओमासे यांने ९४.८ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच वैभवी कुंभार हिने ९१.८ व फरहात जमादार हिने ९१.४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी गणितात व चार विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.
नियमित अभ्यासक्रमाबरोबर विविध स्पर्धा, सहशालेय उपक्रम, क्रिडा प्रोत्साहन व वैयक्तिक लक्ष यामुळे निकाल व गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त ॲड. विरेंद्र पाटील, समन्वयक प्राचार्य सतीश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शाळेच्या अधीक्षिका प्राचार्य ख्रिस्तिना मार्टिन, प्रशासक प्रा. रफीक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका आश्विनी येलकर, सर्व स्टाफ व पालक यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे निकाल चांगला लागल्याचे सांगून संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यी, पालक व स्टाफचे अभिनंदन केले. केंब्रिज स्कूलच्या या उज्ज्वल निकालामुळे उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट व शाळेचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.