Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र दिनी पृथ्वीराजबाबांनी असा केला तिरंग्याचा सन्मान..!



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ मे २०२४
महाराष्ट्र दिन हा आपल्या मराठी माणूस.. मराठी भाषा यांचा गौरव करणारा दिवस आणि जागतिक कामगार दिन हा कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा दिवस..!

पृथ्वीराज पाटील यांच्या कठोर परिश्रमातून साकारलेल्या गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात या दिनानिमित्त बाबांनी संस्थेतर्फे झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात अमोल कराडे या सेवकाच्या हस्ते तिरंगा फडकावून माय माऊली महाराष्ट्र आणि कष्टकऱ्यांच्या घामाला सॅल्युट ठोकला. लौकीक अर्थाने मोठ्या माणसाच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचा प्रघात असलेल्या काळात पृथ्वीराज बाबा एका चतुर्थ श्रेणी सेवकाच्या हस्ते तिरंगा फडकावितात ही घटना निश्चितच दखलपात्र आहे. संवेदनशील आणि दयाळू अंतःकरणाची माणसंच असं करु शकतात.


दैनंदिन कामकाजात घाम गाळून राष्ट्रनिर्माण कार्यात जे हातभार लावतात ती माणसं प्रतिष्ठेचे हक्कदार असतात या विचारावर यानिमित्ताने बाबांनी शिक्कामोर्तब केले. संस्था या कष्टकऱ्यांच्या घामावर चालतात हा बाबांनी यावेळी व्यक्त केलेला विचार अंतर्मुख करणारा आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त बाबांनी राज्याच्या स्थापनेत हुतात्मा झालेल्या व्यक्तींना व संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केलेल्या नेत्यांना व कामगार चळवळीत आहुती दिलेल्या कामगारांना अभिवादन केले. ही कृतज्ञता फार महत्वाची आहे. केवळ टाळ्या घेण्यासाठी केलेल्या भाषणापेक्षा कृतीतून आदर्श जपणारे पृथ्वीराज पाटील हे मानवतावादी संस्कृतीचे पाईक आहेत एवढे मात्र निश्चित..!