Sangli Samachar

The Janshakti News

वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ७.५ फुटाचा अजस्र अजगर



| सांगली समाचार वृत्त |
गगनबावडा - दि. ७ मे २०२४
(मालोजीराव माने, शिरोळ)
कोदे खुर्द मधील मानवी वस्ती शेजारी ७.५ फुटाचा अजगर असल्याची बातमी समजताच सदर ठिकाणी वन विभाग गगनबावडा यांची रेस्कू टीम पोहोचून सदर अजगरास रेस्क्यू करून पुन्हा त्याच्या जंगल अधिवासात सोडण्यात आले. हा अजगर बिनविषारी साप प्रजाती मधील आहे. तात्काळ रेस्क्यू टीम जागेवर पोहचल्यामुळे संभाव्य धोका टळला. यावेळी मा. वनक्षेत्रपाल अधिकारी गगनबावडा प्रियांका भवर यांचे मार्गदर्शनाखाली गगनबावडा रेस्कू टीमचे रेस्क्युअर समाधान व्होवळे, सचिन सुतार, अजित जाधव आणि अजित पाटील यांनी या सापाला रेस्कू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. इंडियन रॉक पायथन म्हणून ओळखला जाणारा हा साप बिनविषारी असून जवळपास 18 फुटांपर्यंत वाढतो. कोंबड्या, लहान कुत्रे, शेळ्यांची पिल्ले यांना आपले भक्ष्य बनवतो. मानवास याचा कोणताही धोका नाही. घोणस समजुन लोक याला मारतात म्हणून या सापाला मानवी वस्तीपासून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. - समाधान व्होवळे, रेस्कुअर