| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ मे २०२४
गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या मुख्य नलिकेमधून ७६ हजारांच्या पाण्याची चोरी करण्यात आल्याची तक्रार खरसुंडी (ता. आटपाडी) येथील ग्रामविस्तार अधिकार्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या पाणी चोरी प्रकरणी सिद्धेश्वर पुजारी यांच्या विरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असून या योजनेची मुख्य जलवाहिनी पाच इंची आहे. विहिरीपासून गावी जलकुंभापर्यंत जलवाहिनी येत असताना मध्येच एक इंची जोडणी करून हे पाणी विहिरीत घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरू होता. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा दाब कमी होऊन पाणी कमी उपलब्ध होत होते. यामुळे पुजारी यांनी ७६ हजाराच्या पाण्याची चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.