yuva MAharashtra माहेरून आलेल्या पत्नीला विचारला हा प्रश्न; रागात बायकोनं नवऱ्याचा हातच मोडला...

माहेरून आलेल्या पत्नीला विचारला हा प्रश्न; रागात बायकोनं नवऱ्याचा हातच मोडला...



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ मे २०२४
पती-पत्नीच्या भांडणाची अनेक प्रकरणं समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेलं एक प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. यात एक महिला आपल्या माहेरी गेली होती. यानंतर बऱ्याच दिवसांनंतर ती माहेरच्या घरून सासरी परत आली. ती घरी आल्यावर पतीने तिला एवढे दिवस माहेरी राहण्याबाबत प्रश्न विचारला. यानंतर पत्नी इतकी भडकली की तिने भांडण सुरू केला. इतकंच नाही तर तिने पतीवर वीटेनं हल्ला करण्यास सुरूवात केली. वीट हातावर लागल्याने तिच्या पतीचा हात फ्रॅक्चर झाला. याशिवाय तिने पतीच्या शरीरावर इतर ठिकाणी आणि डोक्यातही वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. पती-पत्नीच्या वादाचं हे अजब प्रकरण सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी त्याच्यावर रागावून आई-वडिलांच्या घरी गेली होती. अनेक दिवस माहेरी राहिल्यानंतर पत्नी सासरच्या घरी परतली. तेव्हा पतीने तिला इतके दिवस माहेरच्या घरी राहण्याचं कारण विचारलं. याशिवाय पतीने तिला असंही विचारलं की, तू इतके दिवस माहेरच्या घरी काय करत होती? नवऱ्याने विचारलेल्या प्रश्नाने पत्नी नाराज झाली. तिला इतका राग आला की त्यानंतर तिने पतीवर हल्ला केला. पतीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, पत्नीने केवळ त्याचा हात मोडला नाही तर त्याच्या डोक्यावर विटही मारली, त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती पत्नीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे.