| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ मे २०२४
बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते पुढच्या आठवड्यात लगेच पूर्ण करा. आता मे महिना संपत आला आहे. त्यानंतर जून महिना सुरू होईल. जून महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्या असणार आहेत. अशा स्थितीत तुमचे महत्त्वाचे काम अडकू शकते. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.
पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात बँकांना एकूण 8 दिवस सुट्टी असेल. बकरी ईदचा/ईद-उल-जुहा हा सण 17 जूनला असणार आहे. त्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील. 18 जून रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्येही बँकांचे कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
'या' दिवशी बँका बंद राहतील
2 जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील
8 जून रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत
9 जून रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत
16 जून रोजी रविवार असल्याने बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल.
17 जूनला बकरीदनिमित्त बँका बंद राहणार आहेत
22 जूनला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
रविवार असल्यामुळे 23 जून रोजी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
रविवार असल्यामुळे 30 जून रोजी बँका बंद राहणार आहेत.
बँकेला सुट्टी असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँकांच्या सुट्यांचा या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँक बंद असताना, तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकता. बँक बंद असताना सर्व ऑनलाइन सुविधा सुरू राहणार आहेत.