yuva MAharashtra पंडित लाल बहादूर शास्त्रीजींच्या नातवाने केली काँग्रेसची पोलखोल !

पंडित लाल बहादूर शास्त्रीजींच्या नातवाने केली काँग्रेसची पोलखोल !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २५ मे २०२४
दिल्ली काँग्रेसचा एकही कार्यकर्ता काँग्रेस आणि आप यांच्यातील युतीच्या बाजूने नव्हता असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी केला. ते म्हणाले की, दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत, आप आणि काँग्रेसमधील ही युती कायम राहणार नाही आणि मला त्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस नेतृत्वही हे सत्य मान्य करत आहे.


यावेळी त्यांनी घोटाळ्यावरही भाष्ट केले. ते म्हणाले, जेव्हा केजरीवालसारखा मुख्यमंत्री घोटाळ्यांमध्ये सहभाग नसल्याचा दावा करतात. तेव्हा ते दिशाभूल करणारे आहे. ऐषोआराम नाकारण्यापासून ते आता व्यापक सुरक्षा असलेल्या हवेलीत राहण्यापर्यंत, त्यांचा प्रामाणिकपणा पोकळ वाटतो. इतक्या विश्वासार्ह व्यक्तींनी त्यांचा विरोध केला, तर तेच बरोबर कसे?

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ते म्हणाले एकेकाळी महिलांच्या सुरक्षा आणि अधिकारांचा चॅम्पियन असलेला पक्ष इतका खाली झुकला आहे की अशा घटना आतमध्ये घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिभव कुमारने अरविंद केजरीवाल यांचे डोळे आणि कान म्हणून काम केल्याचेही ते म्हणाले.