| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
दुष्काळी भागात आलेल्या पाण्याचे श्रेय हे संजयकाकांना द्यावं लागेल आणि संजयकाकांना निवडून दिलेल्या जनतेला द्यावे लागेल. यापुढे विकास कामांची आणि संजयकाकांची गॅरंटी माझी, तुम्ही फक्त त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, संजयकाका पाटील यांच्यासारख्या खासदार मी पाहिलेला नाही जिल्ह्यातल्या अनेक विकास कामांसाठी ते नेहमीच दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांना भेटत होते. मला तर ते शेकडो वेळा भेटलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. प्रधानम मंत्री कृषी संजीवनी योजनेतून सात प्रकल्प आणि बळीराजा जल संजीवनी योजनेतून दोन प्रकल्प मंजूर केले. त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी तर तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. तुमची विकासाची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजयकाकांना निवडून द्या. आमचं सरकार आणा. तुमच्या सर्व होतील. असे म्हणाले.