yuva MAharashtra गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२४
सांगलीवाडीमधील कदमवाडी रस्ता येथे २८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता रिक्शातून ६ गायींची वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असतांना गोरक्षकांनी पकडली. गोरक्षकांनी रिक्शाचालक अमजद मुजावर याला चोप देऊन त्याला पोलिसांच्या कह्यात दिले, तर या प्रकरणातील १ व्यापारी अय्याज बेपारी पसार झाला आहे. 

'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने'चे संस्थापक अध्यक्ष विनायक येडके, कार्याध्यक्ष धर्मेंद्र आबा कोळी आणि सांगली जिल्हाध्यक्ष शिवतेज सावंत यांनी ही वासरे पकडली.

रिक्शाचालक अमजत मुजावर याने 'ही वासरे अय्याज बेपारी या व्यापार्‍याची आहेत', असे सांगितले. सांगली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून पंचनामा करून ५ वासरे आणि १ रेडकू कोंडवाड्यात सोडण्यात येणार आहे.


'गायींच्या वासरांचा कत्तलीसाठी वापर करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा धर्मवीर छत्रपती गोरक्षक सेना तीव्र आंदोलन छेडेल', अशी चेतावणी श्री. विनायक येडके यांनी दिली आहे. या वेळी गोरक्षक सर्वश्री ओंकार मासाळे, आर्यन वीर, आदित्य वीर, सौरभ सटाले, राहुल बोळाज, शुभम हेरवाडे, अभिषेक पाटील, चेतन गायकवाड आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.