| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० मे २०२४
तुम्हाला माहिती आहे का? की तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसले तरीही तुम्ही दुकानदाराला पैसे देऊ शकता. Google Pay ने एक नवं फीचर आणलं आहे. त्याच्या मदतीने, पेमेंट करणं खूप सोपे होणार आहे. कारण युजर्सना 3 नवीन फीचर्स मिळणार आहेत. यातील सर्वात चांगलं फीचर म्हणजे Buy now Pay Later. कारण या फीचरद्वारे वापरकर्त्यांना बँक खात्यातून पैसे न कापता पेमेंट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
गुगल पेने दिलेल्या माहितीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला ती काळजीपूर्वक वापरावी लागेल. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्हाला लगेच पैसे द्यावे लागणार नाहीत. यासाठी तुम्ही Installment हा पर्याय वापरू शकता. म्हणजे तुम्ही आता वस्तू घेऊ शकता, पण त्याचं पेमेंट मात्र नंतर टप्प्याटप्प्याने करा. एक प्रकारे, हे फीचर पैसे देण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करेल.
याशिवाय, Google Pay द्वारे इतर फीचर जोडण्यात आली आहेत. यामध्ये, क्रोम आणि अँड्रॉइडवर ऑटोफिल सक्षम आहे. याचा अर्थ तुम्ही फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन वापरून तपशील ऑटो फिल करु शकता. यानंतर तुम्हाला पेमेंट करणे खूप सोपे होईल. एकदा तुम्ही हे फीचर अॅक्टीव्ह केलं की तुम्हाला आणखी कोणतेही सुरक्षा प्रश्न विचारले जाणार नाहीत.
Google Wallet-
वॉलेट ॲप गुगलने काही काळापूर्वी लाँच केले होते. हे एक डिजिटल वॉलेट आहे जे अनेक लोक वापरत आहेत. यामध्ये तुम्ही कार्डचे सर्व तपशील जोडू शकता. एकदा तुम्ही हे केल्यावर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ते पेमेंट ॲपशीही कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करणे खूप सोपे होईल.