yuva MAharashtra राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२४
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्याचप्रमाणे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, स्टेशन चौक येथे व विजयनगरमधील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, मा.नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती हरिदास पाटील, मा.नगरसेवक विष्णू माने, मा.नगरसेेवक शहाजी कोकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,धनंजय रूपनर,आनंदा म्हारगुडे,अमित पारेकर आदी उपस्थित होते.