yuva MAharashtra सांगलीत मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले

सांगलीत मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान मंगळवार, दि. 7 मे व मतमोजणी मंगळवार, दि 4 जून रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 40 गावात आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट १८६२ (सन १८६२ चा मुंबई कायदा क्रंमाक ४) च्या कलम ५ व ५ अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणी च्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते गुरुवार, दि. 9 मे व 6 जून 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.