Sangli Samachar

The Janshakti News

लोकशाही,संविधान जिवंत राहिला तरच माहिती अधिकार राहिल- शाहीन शेख



| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. १४ मे २०२४
श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२४ व्याख्यानमालेतील चौथे पुष्प ज्येष्ठ पत्रकार व माहिती अधिकारकर्ते शाहिन शेख(मिरज) यांनी 'लोकशाही बळकटीसाठी माहिती अधिकाराचा वापर 'या विषयांवर गुंफले. त्या प्रसंगी प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले,कायद्याचा वापर चांगल्यासाठी करा. नाही तर एखाद्याची जिरवा म्हणून नको.

रुग्ण हक्क, साठेबाजार, रेशन, पेन्शन, खाजगी व सरकारी आस्थापनाला लागू आहे. ३० दिवसात माहिती प्राप्त करू शकता. ३० दिवस अपिलात जाण्यासाठी कालावधी असतो. दारिद्रय रेषेखालील लोकांना फी नाही. इतरांना १० रुपये फी आहे.

यापेक्षा तुमचे विचाराचा सौंदर्यशास्त्र,नीतिमूल्य तुमचा आचरण तोंडात साखर, डोक्यावर बर्फ व पायात भिंगरी हे फक्त म्हणण्यासाठी नव्हतं तर त्या काळामध्ये आमच्या महात्मा बसवन्नांनी हा आदर्श दाखवून दिला.


दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना मोफत माहिती मिळते त्यांना एक रुपये द्यायची गरज नाही आणि आता जर वापरला तर तुमच्यावर शासनाचा महसूल बुडवला बोला म्हणून कायदा झाला म्हणून कागदपत्रे परंतु माहिती अधिकार सामूहिकपणे वापरली पाहिजे.चांगले पाणी मिळण्यासाठी शंभर माहिती अधिकाराच्या अर्ज सामुदायिकपणे दाखल करा. लोकशाही बळकटीकरणासाठी माहिती अधिकाराचा वापर करावा. 

शिरोळमध्ये प्रदूषण होत असेल, एखाद्या कामासाठी मंजूर निधी किती झाला ?मागणी किती केली ? मंजूर किती झाला ? आणि खर्च किती झाला ? रस्त्याचे मोजमाप करत असताना सुद्धा माहिती अधिकार काय म्हणतो ? रस्ता चांगल्या दर्जाचा झालाय का? तपासणीचे तंत्र आणि मंत्र माहिती अधिकारात दिले आहेत. नमुने तपासण्याचे अधिकार माहिती अधिकार दिलेले आहेत. 26 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही कागदावर काही लिहू नका. माहितीच्या अधिकाराचा अर्ज देऊ नका परंतु दर सोमवारी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत हवी ती माहिती पाहू शकता. हा 26 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार निर्णय झालेला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव होते. यावेळी सचिन भुशिंगे,सचिन माळी,विजय आरगे,गजानन संकपाळ,शक्तीजीत गुरव,डॉ. दगडू माने,धनाजी चुडमुंगे, प्रसन्नजीत दिक्षित,दिपक कामत,योगेश पांडव,अमर माळी,अशोक कांबळे, दिलीप शिरढोणे यांचे सह शरण- शरणी उपस्थित होते.