yuva MAharashtra नवनियुक्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पृथ्वीराज पाटील यांनी दिला कानमंत्र !

नवनियुक्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पृथ्वीराज पाटील यांनी दिला कानमंत्र !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० मे २०२४
सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती, औद्योगिक सेल व महिला अल्पसंख्याक आघाडीच्या नवनियुक पदाधिकाऱ्यांना सांगली जिल्हा शहर कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.रोशन सांगलीकर सांगलीवाडी शहर जिल्हा सरचिटणीस अनु. जाती, प्रशांत होवाळे बुधगाव ग्रामीण सरचिटणीस अनु. जाती, सचिन कांबळे बिसूर ग्रामीण सचिव अनु. जाती,गजानन लोहार सांगलीवाडी शहर उपाध्यक्ष औद्योगिक सेल, प्रमोद आवळे कसबे डिग्रज मिरज तालुका सचिव अनु. जाती व फरजाना मुलाणी सांगलीवाडी शहर उपाध्यक्षा अल्पसंख्याक महिला आघाडी अशा निवडी करण्यात आल्या.


पृथ्वीराज पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना'जनतेची कामे करा.. पक्षाच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करा. स्वातंत्र्य, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकट करा असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या. '

यावेळी प्रशांत कांबळे, अजय देशमुख, अल्ताफ पेंढारी, संजय मोरे व अजिंक्य मोहिते व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.