yuva MAharashtra विशाल पाटील प्रेमी एकसंघच; पराभव दिसू लागल्याने विरोधकांनी घेतला खोट्याचा आधार - जयश्रीताई पाटील

विशाल पाटील प्रेमी एकसंघच; पराभव दिसू लागल्याने विरोधकांनी घेतला खोट्याचा आधार - जयश्रीताई पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२४
मदन भाऊ युवा मंच वा मदन पाटील गटाचा कुठलाही कार्यकर्ता विशाल पाटील यांच्यावर नाराज नाही. विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने खोट्या व्हिडिओचा व बातमीचा आधार घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी व मतदारांनी या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जयश्रीताई पाटील यांनी केले आहे.

काल सकाळपासून सोशल मीडियावर मदन पाटील गट नाराज असून, विशाल पाटील यांच्या प्रचारातून अलिप्त राहण्याबाबत जयश्री ताईंच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव असल्याची बातमी व्हायरल होत आहे. काही काळ नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु ही बातमी जयश्री त्यांच्या कानावर गेल्यानंतर तात्काळ खुलासा केला असून, आम्ही कोणीही जुन्या घटनांवर नाराज नाही. हे सर्व विसरून आम्ही एक झालो आहोत. त्यामुळे अशा खोट्या अफवांवर मतदार किंवा कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही, आम्ही एकसंघपणे विशाल पाटील यांच्याबरोबर असून, यापुढेही दोन्ही गट ताकतीने कार्यरत राहतील. विशाल पाटील यांचा विजय नक्की आहे. खोट्या बातम्या पसरविणाऱ्या चॅनेलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जयश्रीताईंनी सांगितले आहे.


जयश्रीताई पाटील यांच्याप्रमाणे सौ. पूजा विशाल दादा पाटील यांनीही भावना व्यक्त केल्या असून दादा घराण्याला संपवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 

सांगली लोकसभेचे उमेदवारी मिळू नये, इथपासून, योग्य चिन्ह मिळू नये इथपर्यंत अनेक चुकीचे प्रकार करण्यात आले आहेत, असा आरोप करून, सौ पूजा पाटील यांनी याबाबत आता जनताच न्याय देईल असे म्हटले आहे.