| सांगली समाचार वृत्त |
गांधीनगर - दि. २८ मे २०२४
गुजरातमधील भरुचमध्ये अल्ताफ हुसेन शेख नावाच्या व्यक्तीने रस्त्यावरून चालत असलेल्या जैन साध्वींवर हल्ला केला. हल्ला करण्यापूर्वी त्याने या साध्वींचा पाठलाग केलाचा देखील आरोप आहे. पोलिसांनी आरोपी अल्ताफ हुसेन शेखला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जैन श्वेतांबर साध्वी भरूच येथून जैन साध्वी विहारकडे रवाना झाल्या होत्या.
विहारचा एक सेवकही त्याच्यासोबत होता. त्यांना काही अंतरावर सोडून सेवक परत गेला. यानंतर साध्वींनी कोणाचीही साथ न घेता आपला प्रवास सुरू ठेवला. दरम्यान, महंमदपुरा येथील अल्ताफ शेख हुसेन हा रस्त्यावर आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तो लांबपर्यंत त्यांचा पाठलाग करत राहिला आणि नंतर त्यांना घाबरवू लागला. साध्वींना धमकी दिल्यानंतर अल्ताफ हुसेन शेख याने साध्वींवर आरडाओरडा सुरू केला.
साधे जीवन जगणाऱ्या आणि सामान्यतः पुरुषांपासून दूर राहणाऱ्या जैन साध्वींनी अल्ताफ हुसेन शेखला दूर राहण्याचा इशारा दिला. त्यांनी अल्ताफला दूर राहण्यास सांगितले तेव्हा त्याने एका साध्वीवर हल्ला केला आणि त्यांना लाथ मारली. साध्वी जमिनीवर पडल्यावर त्याने सर्वांवर बेल्टने हल्ला केला.
अल्ताफच्या हल्ल्यातून साध्वींना एका व्यक्तीने वाचवले. त्यांने गावकऱ्यांना माहिती दिली, त्यांनी अल्ताफ हुसेन शेखला शोधून अटक केली. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्ताफ हुसेनला ताब्यात घेतले. पोलीस सध्या अल्ताफची चौकशी करत आहेत.