| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ मे २०२४
पेठ रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. मात्र काही ठिकाणी काँक्रिट कामावर वेळच्यावेळी पाणी मारले नसल्याने काम दर्जेदार होत नसल्याचे निदर्शनास येते. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक जागृती मंचच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे. रस्त्याचे काम गतीने सुरू आहे, मात्र काही ठिकाणी काँक्रिटचा जो थर टाकलेला आहे, त्याला योग्य प्रमाणात
पाणी मिळाले नसल्याने सिमेंट उखडू लागले आहे. राज्य महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून कामाचा दर्जा टिकवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक वळवण्यात आलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघातास निमंत्रण मिळते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे साखळकर यांनी सांगितले.