yuva MAharashtra 'डिअर लव्ह' शुक्रवारपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !

'डिअर लव्ह' शुक्रवारपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२४
प्रेमाचा प्रेमापलिकडचा अनोखा प्रवास दाखवणारा... सांगलीच्या कलाकारांनी तयार केलेला 'डिसर लव्ह' हा चित्रपट २४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सांगतीचाच कलाकार अमरनाथ खराडे, ऋषिकेश तुराई यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची माहिती अमरनाथ खराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी प्रथमेश कुलकर्णी, यशोधन गडकरी, ओंकार रजपूत, अभिषेक वेर्लेकर आदी उपस्थित होते.

मंत्रमुग्ध करणारे चित्रीकरण, तरुणाईला आवडणारी गाणी आणि सद‌ाबहार अभिनय... अभिनेता अमरनाथ खराडे, किरण ढाणे या जोडीचा अभिनय...या जोडीला साऊथ सिनेमातील अॅलन प्रितम बांचे अप्रतिम संगीत... अशी या चित्रपटाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.


सांगलीत दोन थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ए. एस. के. फिल्म निर्मित मराठी चित्रपट 'डिअर लव्ह' येत्या २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रद्विशत होत आहे. या चित्रपटात अमरनाथ खराडे, किरण डाणे, यशोधन गडकरी, अभिषेक वेर्णेकर, लक्ष्मी विभूते, राहुल जगताप आदी कलाकरांनी काम केले आहे. या चित्रपटासाठी संगीत प्रफुल- स्वप्निल यांचे असून गायक शंकर महादेवन, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, स्वप्निल गोडबोले यांनी या चित्रपटातील गाणी गायीली आहेत.

'डिअर लव्ह' हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेमकथेवर आधारीत नसून, स्वप्न, प्रेम आणि नातेसंबंध यावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण, सांगली, सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे.

अमरनाथ खराडे, किरण ढाणे यांनी यापूर्वी लागिर झालं जी' या टी.व्ही. मालिकेत भूमिका साकारल्या आहेत, त्यानंतर त्यांनी अनेक टि. व्ही. मालिका, जाहिराती, तसेच चित्रपटात भूमिका केल्या आहेत, तसेच ऋषिकेश तुराई यांनी 'वेड' हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे.